भीमाच्या लेखणीची धार झाली रमा
भीमाच्या क्रांतीची मशाल झाली रमा
अहो ज्ञान सूर्याचा प्रकाश झाली रमा
ज्ञान सागराचा किनारा झाली रमा
भीम वादळाचा आवाज झाली रमा
नऊ कोटी लेकरांची माय झाली रमा...
सोमेश्वर सिरसाट...✍️
🔹 माता रमाई — त्यागाची मूर्ती
माता रमाई आंबेडकर यांची प्रकृती ठीक नव्हती.
बाबासाहेब परदेशात जाणार होते. त्या काळात रमाईंना क्षयरोगाने ग्रासले होते. डॉक्टरांनी वातावरण बदलण्याचा सल्ला दिला. म्हणून बाबासाहेबांनी त्यांना वराळे मामांकडे जाण्यास सांगितले. वराळे मामा मुलांचे वसतिगृह चालवत होते. बाबासाहेबांना वाटले, त्या मुलांमध्ये राहिल्याने रमाईंना बरं वाटेल.
रमाई वसतिगृहात पोहोचल्या, पण तिथे भयाण शांतता होती.
ना मुलांचा आवाज… ना खेळण्याचा गोंधळ…
रमाईंनी विचारले,
“मामा, हे मुलांचे वसतिगृह आहे ना?”
वराळे मामा म्हणाले, “हो…”
“मग मुलांचा किलबिलाट का ऐकू येत नाही?”
तेव्हा वराळे मामा हळहळत म्हणाले,
“शासनाचा निधी दोन दिवसांनी येईल, पण आज वसतिगृहात मुठभर अन्नही नाही… आज तर माझ्या घरची चूलही पेटलेली नाही…”
हे ऐकून रमाई स्तब्ध झाल्या.
त्यांचे डोळे पाणावले…
✍️
दशा पाहुनी त्या भुकेल्या जीवाची
दागिने रमान मोडीले सोन्याची…
रमाईंनी आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे मामांकडे दिल्या.
वराळे मामा नकार देऊ लागले.
“बाबासाहेब काय म्हणतील?”
रमाई शांतपणे म्हणाल्या,
“मुलांपेक्षा मला सोनं-नाणं मोठं नाही.
या मुलांची भूक भागेल, यातच माझं समाधान आहे.
तुम्ही या बांगड्या घ्या… आणि मुलांच्या जेवणाची व्यवस्था करा.”
रमाईंनी स्वतः आयुष्यभर कष्ट केले.
शेणगोवऱ्या थापून संसार चालवला.
दारिद्र्य सहन केलं.
पण त्या भुकेल्या लेकरांना पाहून त्यांनी क्षणाचाही विचार न करता स्वतःचे दागिने दिले.
त्या दिवशी मुलांचे पोट भरले…
पुन्हा वसतिगृहात मुलांचा किलबिलाट घुमला…
तो आवाज ऐकून रमाईंच्या चेहऱ्यावर समाधान फुलले.
जेव्हा त्या परत निघाल्या, तेव्हा सर्व मुले त्यांच्या भोवती जमा झाली.
एका चिमुकल्याने विचारले,
“आम्ही तुम्हाला आई म्हटलं तर चालेल का?”
रमाईंचे डोळे अश्रूंनी भरून आले…
त्यांनी फक्त होकारार्थी मान हलवली…
आणि त्या दिवसापासून
संपूर्ण समाज त्यांना प्रेमाने म्हणू लागला —
आई रमाई
✍️
कीर्ती तुझी आई झाली ठायी ठायी
रमाईची झाली माता रमाई…
आई, तुम्हांस त्रिवार अभिवादन…

It's a great thing....
उत्तर द्याहटवा