या सागराच्या लाटा छेदिती काळजाला माझ्या आश्रुंच्या या धारा शोधीती पावसाला फाटल्या रानाला शब्द फुटलेला पावसाच्या वाटेवरी डोळा हा दिपलेला झोपडीच्या माझ्या दारी आहे सावकार बसलेला सोमनाथ या कथेला प्रश्ऩ हा पडलेला सरकार झोपलेला डाव संपलेला आवसाच्या या राती डोळा हा मिटलेला आसा-कसा हा माझ्या जिवनाचा खेळ झाला.... सावलीही साथ सोडी आजच्या या प्रसंगाला या सागराच्या लाटा छेदिती काळजाला माझ्या आश्रुच्या या धारा शोधीती पावसाला.... खर पाहील तर मी या कवितेत खूप बदल करायला हवेत, पण करण्याची इच्छा होत नाही कारण मी लिहिलेली ही पहिली कविता आहे. ही कविता लिहिल्या नंतर मी लिखाणाला सुरवात केली होती. याच कवितेने मला कवी/ गीतकार केलं आहे.
Someshwar Sirsat Shayari हा माझा अधिकृत ब्लॉग असून मी, कवी, गीतकार व शायर सोमेश्वर सिरसाट, सामाजिक, राजकीय, विद्रोही, प्रेम, वास्तववादी तसेच शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीवर आधारित कविता, गाणी, शायरी आणि लेख या ब्लॉगद्वारे प्रकाशित करतो. समाजातील अन्याय, बेरोजगारी, शेतकरी, कामगार, शिक्षण, परिवर्तन आणि मानवी भावनांना शब्दबद्ध करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. मराठी साहित्य, भीमगीत, परिवर्तनवादी लेखन, सामाजिक चळवळी आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी रचना वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला नक्की भेट द्या