शनिवार, १३ मे, २०१७

आश्रुच्या या धारा

या सागराच्या लाटा
छेदिती काळजाला
माझ्या आश्रुंच्या या धारा
शोधीती पावसाला

फाटल्या रानाला
शब्द फुटलेला
पावसाच्या वाटेवरी
डोळा हा दिपलेला


झोपडीच्या माझ्या दारी
आहे सावकार बसलेला
सोमनाथ या कथेला
प्रश्ऩ हा पडलेला

सरकार झोपलेला
डाव संपलेला
आवसाच्या या राती
डोळा हा मिटलेला

आसा-कसा हा माझ्या
जिवनाचा खेळ झाला....
सावलीही साथ सोडी
आजच्या या प्रसंगाला

या सागराच्या लाटा
छेदिती काळजाला
माझ्या आश्रुच्या या धारा
शोधीती पावसाला....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी शायरी marathi shayari

सोमेश्वर सिरसाट