सोमवार, १५ मे, २०१७

Dr.babasaheb ambedkar


भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव प.पुज्य विश्वभूषन क्रांतीसूर्य  विश्वरत्न डॉ.बाबासाहेब अंबेडकर यांना ञिवार अभिवादन. 
१४एप्रिल १८९१ रोजी.आई भिमाईच्या पोटी ,१४ तारखेला,१४ वे रत्न  आले जन्माला.
आठवन करा त्या इतिहासाची 
स्वतंञ पुर्व काळाची.
भारतावर हुकूमत होती,
इंग्रज सरकाराची .
भारतीय लोक इंग्रजांचे गुलाम होते.
आणि त्या काळामध्ये 
हे दलित गुलामांचेही गुलाम होते.
आणि त्याच गुलामीची जंजीर तोडण्यासाठी एक शोला 
भडकला होता.एक ज्वालामुखी कडकला होता.
तोच तर हा भिम रामजी अंबेडकरांचा बेटा होता.
रामजी बाबा लष्करात सूभेदार होते. बाबासाहेबांनी खूप शिकावे ,मोठे व्हावे ,विद्ववानाच्या रांगेमध्ये आग्रेसर राहावे.अशी रामजी बाबांची मनापासून इच्छा होती. त्या काळामध्ये असलेली जीतीयता,रूढी परंपराआणि मनुवाद्यांचे षडयंञ यामूळे जगन असाह्य झाल होते.गळ्यात मडके आणि पाठीला झाडू यांमूळे  ञस्त असलेल्या 
या दलितांना गुलामगीरीतून मुक्त करावे ,असे रामजी बाबांना वाटत होते. बाबासाहेब शाळेत जात असतांना त्यांना वर्गाच्या बाहेर बसावे लागत असे .
शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय होती, पण बाबासाहेबांसाठी नाही जेव्हा एखादा security त्यांच्या हातावर पाणी टाकायचा तेव्हा त्यांना पाणी मिळे.
आमची सावली जरी अंगावर पडली तरी यांना विंटाळ व्हायचा आणि तो कशाने जात होता.. हे तर तुम्हाला माहीतच आहे. 

आमची सावली जरी 
अंगावर पडली तरी 
यांना विंटाळ व्हायचा 
आम्ही सार्वजनीक
ठीकानी पिलो की
यांना विटांळ व्हायचा 
लाचारीची पण हद्द असते.
जेव्हा एका दलित शिक्षकाने
यांना शिक्षण दिले 
 तेव्हाही यांना विंटाळ झाला नाही.
जेव्हा एका दलित डॉक्टराने यांचा उपचार केला 
तरीही यांना विंटाळ झाला नाही.
जेव्हा भिमराव यांचा जावई 
झाला तरी पण यांना विंटाळ.... झाला नाही.
तिरंगा झेंड्यावर अशोक चक्र झळकवल तरी यांना विंटाळ झाला नाही.... 


बडोद्याची नोकरी सोडावी लागली, केवळ जाती मुळे.
गाडीवानाने गाडीच्या खाली उतरून दिले, केवळ जाती मुळे.
म्हशी भादरनारे वारीक बाबासाहेबांची कटीन करत नव्हते, केवळ जाती मुळे.

बाबासाहेब शाळेत असतांना घडलेला एक प्रसंग सांगतो.
  ...गणिताचा तास चालू होता.
शिक्षकांनी एक गणित फळ्यावर सोडवून दाखवले व दुसरे गणित फळ्यावर लिहले व मूलांना विचारल कोन सोडवून दाखवेल.
सर्व वर्ग शांत झाला होता.
कारण ते गणित कोनालाच सोडवता येत नव्हते,
भिवाने फक्त हात वर केला होता शिक्षकाला 

विचारले मी सोडवून दाखवू म्हटल  आणि 
भिवा फळ्या कडे जाउ लागला.
भिवा फळ्या कडे जात होता तोवर,दोन चार ब्राम्हणांची टवाळी पोर ओरडत म्हणाली सर फळ्या मागे आमचे डब्बे आहेत, ते बाटतील
हे ऐकून भिवास खूप राग आला, पण नाईलाजाने
भिवास आपल्या जागेवर बसावे लागले. 
आणि त्यानी. त्याच वेळेस निश्चय केला
मी माझ्या समाजास या गुलामगिरीतून मुक्त करील,
 जो पर्यंत मी माझ्या  समजाला या अन्यायातून मक्त करणार नाही  तो पर्यंत मी शांत  बसनार नाही.
आणि मी त्यासाठी खूप शिकेन. त्यांची जीद्द,परीश्रम रामजी बाबांची ईच्छा आणि रमाईची लाभलेली साथ यामुळेच ते एवढे शिक्षण घेऊ शकले.

आणि  म्हणूनच म्हणतो.
पेट्रोल पंपांवर काम करणारा अंबानी करोडपती झाला
क्रिकेट चा खेळाडु सचिन क्रिकेट चा देव झाला.
चहा  विकणारा मोदी  
देशाचा  पंतप्रधान झाला.
पण वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा बाबासाहेब  या देशाचा  शिल्पकार झाला.....


बाबा तूमच्या जन्माने उजळले 
सारे आसमान...
जातीचे माळभ गेले निवळून
घटनेचे तूम्ही शिल्पकार..
दलितांना दिलात तूम्ही आकार
आज झाले आहे
स्वन्प साकार
तिमीरातून तेजाकडे
तेजाकडून प्रगतीकडे
प्रश्न आज उलगडले 
बाबा केवळ आपन होतात म्हणून 
हे सारे घडले.......


महाडचा इतिहास आहे आजूनही  ताजा

त्या काळ्या रामाची बंद केली बाधा 
लिहली घटना अशी  तीचा झाला सगळीकडे गाजावाजा

आहे विश्वात नंबर वन भिमराव माझा....

खूप मोठ्ठा आहे बाबासाहेबांचा इतिहास पण नंतर भेटू आणि मनसोक्त बोलू 
जय भिम
भिम सैनिक 
                  Someshwar Sirsat.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी शायरी marathi shayari

सोमेश्वर सिरसाट