शुक्रवार, १२ मे, २०१७

मी शेतकरी

       

भारताला स्वातंञ्य मिळुन जवळपास ७० वर्ष पुर्ण होत आहेत.पण भारतीय शेतकरी अजुनही पारतंञ्यात आहेत.
भारतक्रुषी प्रधान देश आसला तरी,भारतीय शेतकय्रांना आजुनही स्वातंञ्य नसल्याचे दिसून येते.
तूम्ही म्हणाल हा व्यक्ती वेडा-बिडा तर झाला नाही ना" काहीही बोलतोय,,
पण हे खर आहे भारतीय शेतकरी आजून पारतंञ्यात आहे.तूम्ही म्हणाल हे कसे काय ?
तर बघाशेतकरी आपले पीक चांगले यावे या करिता राञं दिवस धडपड करीत असतो.थंडी,पाऊस, ऊन आणि वारा याचेही त्याला भान नसते. पीक चांगले यावे म्हणून राञं दिवस तो आपल्या जिवनाची पर्वा न करता रक्त आटवत असतो,आणि त्यामध्ये होणाय्रा नैसर्गिक हानी ओला दुष्काळ,सूखा दुष्काळ तर त्याच्या नशीबी पूजलेला असतो.आणि दुष्काळ पडला की न विलाजाने त्याला सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते.निसर्गाने साथ दिली नाही की कर्जाचे ओझे वाढतच जाते आणि तो कर्ज बाजारी होत जातो.
शेतीसाठी लागलेला खर्च सूद्धा त्या शेतीतून मिळत नाही मग सावकाराचे कर्ज कूठून देनार हा प्रश्न त्याला पडतो.
मूलांच्या शिक्षणाची फी न भरू शकल्यामुळे त्याच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहते.आणि नविलाजाने त्याच्यावर सूद्धा तीच वेळ येते.
आणि शेतकय्रांच्या आत्महत्या वाढतच जातात.याचे कारण म्हणजे शेतकय्राला नसलेले स्वातंञ्य.
प्रत्यक उत्पादकास आपल्या वस्तूंची किंमत स्वत: ठरवण्याचा आधिकार आहेत.मग शेतकय्राच्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार शेतकय्रास का नाही.
प्रत्तेक विक्रेता आपला माल कधी कोठे  केव्हा व कोनत्या दराने विक्री करायचा हे ठरवत असतो.
आता आपण तूरीचे उदा; घेउ शकतो. पूर्ण वर्षभर मेहनत करून पिकवलेली तूर ठराविक कालावधीत  विक्री न केल्याने त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले.
स्वत: मेहनत करून पिकवलेली तूर विक्री करण्यासाठी त्यांना वाट पहावी लागत आहे.
शेती प्रधान देशात शेतकरी उपाशी, कीती लाजीरवानी गोष्ट आहे.
आपण "जय जवान जय किसान" हा नारा देतो,पण तो नारा आता काही कामाचा नाही असे वाटू लागले आहे.
एकीकडे दुसय्रा वस्तू विक्रीसाठी पूर्ण वर्ष बाजार खूला व्वा.... काय आमचे मंञीमंडळ आणि त्याचे निर्णय.  सलाम करावा लागेल यांच्या निर्याला.
 स्वत: मेहनत करून पिकवलेल्या मालाची विक्री ठराविक कालावधीत नकेल्याने त्यांना आज अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे दुसय्रा देशातील वस्तू साठी माञ कधीही बाजार खूला ...
आमचे सरकार म्हणते अच्छे दिन आयेंगे कब जब किसान आत्महत्या करगें तब.
आमचे फडणवीस साहेब म्हणतात.शेतकय्राला कर्ज माफ केले तर आत्महत्या थांबतील का मग तूरीचे मार्केट बंद केल्याने थांबनार आहे का....?
तूमचा मास्टर माईंड कधी समजनार नाही आणि शेतकय्राचे प्रश्न तूम्ही कधी सोडवनार नाही.
हेच खर वाटतय.
 आशा एवढीच आहे एका शेतकय्राचे मत तुम्हाला कळावे.
मेहनत करणार शेतकरी आणि त्यांच्या
मालची किंमत ठरवनार ए. सी.मध्ये बसनारे. चश्म्यातून गहू पाहून बोलता गहू खूप बारीक आहे.
आरे राञी शेताला पाणी देण्यासाठी थंडीत एकदा गव्हाच्या वाफ्यात शिरा मग पहा कोनत्या हॉस्पिटल मध्ये अँडमीट करावे लागते ते. भ्रष्टाचार्याने पूर्ण देश लूटला तरी चालेल,पण आम्हीशेतकर्यांचे प्रश्न सोडवनार नाही असे जनू यांन्नी पणच घेतले आहे. असे वाटत आहे.
      9324540468/8087948366 
somasirsat82@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी शायरी marathi shayari

सोमेश्वर सिरसाट