गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

तुझ्या रुपाची जादू

पहिलं जवा तुला ग पोरी
घाव काळजावर पडला
तुझ्या रूपानं केलीया जादू
जीव तुझ्यावरी जडला....

तुझ्या प्रेमाची ग आस 
मला लागला तुझा ध्यास
लव यू च अक्षर खास
सांगायचं तुला कस
सूचना ग काही मला 
जीव पेचात पडला...
तुझ्या रूपानं केलीया जादू
जीव तुझ्यावरी जडला....


 दिसे रंगानं तू गोरी
माझ्या स्वप्नातली परी
केली दीलाची तू चोरी
जीव बसला तूझ्यावरी
असा कसा प्रेमाचा 
गजब इतिहास घडला...
तुझ्या रूपानं केलीया जादू
जीव तुझ्यावरी जडला....

फिरू खंडाळा घाट
शब्द देतो सोमनाथ
धर ग प्रेमाची वाट
सात जन्माची ग साथ



रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

तुम्ही जाव परदेशाला मी चालवीन घराला....

गहिवरून बोले रमाई साहेबाला
 तुम्ही जाव परदेशाला
  मी चालविण घराला
 तुम्ही  जाव  परदेशाला  
   मी चालविन घराला

चिंता सोडा साहेब
तुम्ही घरा.... दराची....
शेण गोवऱ्या थपूनी
चालली गाडी संसाराची
 पूर्ण करावे तुम्ही 
मामाजिंच्या सपनाला

तुम्ही  जाव  परदेशाला
 मी चालविन घराला

कसा आज बेदर्दी 
आला तो काळ
सोडूनी गेले आम्हा
 गंगाधर बाळ
काळाने घातलाय आज
 घाव काळजाला

तुम्ही  जाव  परदेशाला  
 मी चालविन घराला

सांगे सोमनाथ साऱ्या
 जगाला ग बाई
दुखी जनांची झाली
 ती माता रमाई
दारिद्र्याच्या आग्नित 
जाळूनी जीवाला
तुम्ही जाव परदेशाला 
मी चालविन घराला...





मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१९

सांग ना ग पिल्लू...

   गीत सांगना ग पिल्लू.....




                          गीतकार :- सोमेश्वर सिरसाट

तुला सोनू मोनु जानू 
आता कुठवर म्हणायचं
सांगना ग पिल्लू....... 
कधी लगीन करायचय

चढली प्रेमाची धुंदी
आली धंद्यात मंदी
तू भेटली थेटर मधी
घरी सांगून गेली चंदि
लपून छपून ग जानी
आस कुठवर भेटायच
सांगना ग पिल्लू......
कधी लगीन करायचय

मर्द गडी असा रंगला
बांधला दीलामधी बंगला
जीव तुझ्यातच दंगला
जोडा शोभल ग चांगला
चौकमधी तुझ्या माझ्या
लग्नाच बॅनर लावायचय....
सांगना ग पिल्लू......
कधी लगीन करायचय

लय खाऊ नको भाव 
सांगे सोमनाथ राव
गान वंसाच लाव
तवा नाचल सारा गाव
डिजेच्या ताला वरती
आज मलाबी नाचायचय

सांगना ग पिल्लू.....
कधी लगीन करायचय



शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९

प्रेमाची जादू

     तुझ्या प्रेमाची गा आस
     मला लागला तुझा ध्यास
    दिन राती होतोया... प्रिये
     मला तुझाच भास...
    ध्यास तुझा, माझ्या सखे
      मनामधी भरला...
   
   तुझ्या रूपाने केलिया जादू
   जीव तुझ्यावरी जडला...

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

भीमरुपी सूर्य उगवला....

गुलामीच जीवन सार...
आंधारानी भरलेल
कुत्र्याहूनी बेकार होते
तुझे र.... हाल..
भीमरुपी सूर्य उगवला
सार्थक जीवनाच झाल...

पाण्याच्या घोटासाठी
फिरतोय आन वानी
विचारीना तुला कोनी
कालची आठवन मनी
घटना लिहून भिमानी
माणूसपण तुला दिल...

भीमरूपी सूर्य उगवला
सार्थक जिवणाच झाल...

काळोखी भयाण रात
माणूस ना माणसात
जाऊ देईना कोणी
तुला त्या... मंदिरात
बंद होता काळाराम
खुल्ल भिमान केल

भीमरुपी सूर्य उगवला
सार्थक जीवनाच झाल...

तलवारी जैसी तुझ्या
लेखणीची ती धार
वंदन सोमनाथ करी
तुम्हास त्रीवार....
नीच त्या जतीयातेला
ठार भिमान केल...

भीमरुपी सूर्य उगवला
सार्थक जीवनाच झाल...



Someshwar sirsat

रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

यावे तूच साथीला... मराठी लोकगीत

   

यावेळ तुच साथीला…  new मराठी लोकगीत



                  गीतकार :- सोमेश्वर सिरसाट


वेडा झालो तुझ्या विना

ध्यास तुझा लागला….

गंध आज गुलाबाचा

लागलाया प्रीतीला….



प्रीत तुझी लभुदे मज

यावे तूच साथीला…



लाली तुझ्या ओठवरची
ल्याली नवा साज…
चांदण्या रातीला
होई तुझा भास…
ध्यास  तुझा लागे जीवा
जीव तुझ्यातच गुंतला

 प्रीत तुझी लभुदे मज
 यावे तूच साथीला…



थैमान तू घातला
कसा स्वप्ना मंधी
कशी आज चढली
पिरमाची धुंदी
धुंद झाला जीव माझा
तुझ्यातच गुंतला

प्रीत तुझी लभुदे मज
यावे तूच साथीला…



गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९

Someshwar sirsat shayari


      Someshwar sirsat
   
      New photo




लब्ज को जरा संभालके फरमाना
हुजूर
एक बार अगर जबान से निकले
 तो वापस आते नहीं
और दिल पर जब लगते है
तो मरहम से जाते नहीं

मराठी शायरी marathi shayari

सोमेश्वर सिरसाट