यावेळ तुच साथीला… new मराठी लोकगीत
गीतकार :- सोमेश्वर सिरसाट
वेडा झालो तुझ्या विना
ध्यास तुझा लागला….
गंध आज गुलाबाचा
लागलाया प्रीतीला….
प्रीत तुझी लभुदे मज
यावे तूच साथीला…
लाली तुझ्या ओठवरची
ल्याली नवा साज…
चांदण्या रातीला
होई तुझा भास…
ध्यास तुझा लागे जीवा
जीव तुझ्यातच गुंतला
प्रीत तुझी लभुदे मज
यावे तूच साथीला…
थैमान तू घातला
कसा स्वप्ना मंधी
कशी आज चढली
पिरमाची धुंदी
धुंद झाला जीव माझा
तुझ्यातच गुंतला
प्रीत तुझी लभुदे मज
यावे तूच साथीला…
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा