भ्रष्टाचारी उंदरांचा सुळसुळाट हाय कसायाच्या दावणीला जशी बांधली र गाय आर ह्यो भ्रष्टाचारी उंदराचा सूळसुळाट हाय उंदराला मामा म्हणता म्हणता मामा झाली जनता काळा पैसा ठेवायला कसली हो क्षेत्रफळ घनता स्विच बँक आमुची र गड्या म्हणे खंबीर हाय आर ह्यो भ्रष्टाचारी उंदराचा सुळ सुळाट हाय आश्वासनाची नुसती आहे माडी वरती माडी राज्यकर्ता घेतोय र नवीन बंगला अन गाडी देशाला लुटाया सोमनाथ सारे टपलेले हाय आर ह्यो भ्रष्टाचारी उंदराचा सुळ सुळाट हाय
Someshwar Sirsat Shayari हा माझा अधिकृत ब्लॉग असून मी, कवी, गीतकार व शायर सोमेश्वर सिरसाट, सामाजिक, राजकीय, विद्रोही, प्रेम, वास्तववादी तसेच शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीवर आधारित कविता, गाणी, शायरी आणि लेख या ब्लॉगद्वारे प्रकाशित करतो. समाजातील अन्याय, बेरोजगारी, शेतकरी, कामगार, शिक्षण, परिवर्तन आणि मानवी भावनांना शब्दबद्ध करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. मराठी साहित्य, भीमगीत, परिवर्तनवादी लेखन, सामाजिक चळवळी आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी रचना वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला नक्की भेट द्या