मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Someshwar Sirsat | सोमेश्वर सिरसाट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सौदागरों के हाथों वतन | विद्रोही कविता सोमेश्वर सिरसाट | Vidrohi Kavita Someshwar Sirsat

🔹 “सौदागरों के हाथों वतन” ✍️ कवि: सोमेश्वर सिरसाट बेचने चले है ये अब जहाँ साथियों, सौदागरों के हाथों में वतन साथियों। LIC बेच दी, रेल भी बेच दी, बेचने का सिलसिला तो जारी हुआ, वादों का कोई ठिकाना नहीं, उन अच्छे दिनों का अब क्या हुआ? सच का नहीं कहीं निशान साथियों… सौदागरों के हाथों में वतन साथियों। अब चोर कहूँ या फिर चौकीदार इन्हें, ये सेटिंग पे वोटिंग करने लगे, जिंदा इंसान की जब न कीमत मिले, मुर्दों से वोट फिर लेने लगे। बेचे हैं फौजियों के कफ़न साथियों, सौदागरों के हाथों में वतन साथियों। 2)  इन पुढारीयोंसे यारो जरा रहना बचके जळत्या सरणाचेही हे तोडतात लचके फायदा होत नाही तुम्ही जिवंत असून मग धंदा करतात तुमचे कफन विकून अहो वाघाला सांगते, वाघाची मावशी गल्लो गल्ली चर्चा ही होते दर दिवशी अन् भ्रष्टाचार आता हा वाढला किती मांजरीला झाली हो ती उंदराची भीती हिजड्यांच्या हवेलीत ते लपलेरे आता सोशल मीडियावर होते व्हायरल कथा               सोमेश्वर सिरसाट...✍️

जगाला का कळावे...

ही कविता आत्मशोध, संघर्ष आणि स्वतःशी चाललेल्या झुंजीचं प्रतिबिंब आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातल्या त्या टप्प्याचं वर्णन करते, जिथे तो स्वतःलाच शोधत असतो. मी माझा मला ना कळलो जगाला का कळावे... झुंज आरध्यावरी राहिली माझी सोडूनी का पळावे... मी माझा मला ना कळलो जगाला का कळावे... काटे वाटेत असले कितीही तरी दुर मंजिल ही माझी असली तरी मी प्रवासी या जगाचा चालणे का सोडावे... मी माझा मला ना कळलो जगाला का कळावे... डोंगरापरी दुःख येतील आडवे तुला रे त्यातूनी ही फुटेल एक सुखाचा झरा रे तू उद्धारक तुझ्या जीवनाचा हे तुला कळावे... मी माझा मला ना कळलो जगाला का कळावे... हे गरुडा, घे भरारी, जा उंच त्या आकाशी झूंज तुझी ह्या जगी आता आहे रे स्वतःशी शब्द सोमनाथचे हे तुझ्या अंतरी ते रुजावे... मी माझा मला ना कळलो जगाला का कळावे... सोमेश्वर सिरसाट...✍️