शिक्षणाच महत्व हे तुम्हा आम्हाला पटवल फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवल स्त्री शिक्षणाची तेव्हा होती हो गरज देशाला मुलींची पहिली शाळा ती काढिली पुण्याला शिकवण्या मुलींना सावित्री माईला शिकवल फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवल दीन दुबळ्या जनतेची होती परिस्थिती मंदी शाहू महाराजांनी दिली हो शिक्षणाची संधी प्राथमिक शिक्षण हे त्यांनी सक्तीच बनवल फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवल शिकला होता भीम तो वर्गाच्या बाहेर बसून उच्च शिक्षण घेऊन आला ते परदेशी जाऊन शिक्षण हे वाघिणीचे दूध भीमाने शिकवल फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवल सोमेश्वर सिरसाट... 8087948366 somasirsat8 2@gmail.com
Someshwar Sirsat Shayari हा माझा अधिकृत ब्लॉग असून मी, कवी, गीतकार व शायर सोमेश्वर सिरसाट, सामाजिक, राजकीय, विद्रोही, प्रेम, वास्तववादी तसेच शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीवर आधारित कविता, गाणी, शायरी आणि लेख या ब्लॉगद्वारे प्रकाशित करतो. समाजातील अन्याय, बेरोजगारी, शेतकरी, कामगार, शिक्षण, परिवर्तन आणि मानवी भावनांना शब्दबद्ध करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. मराठी साहित्य, भीमगीत, परिवर्तनवादी लेखन, सामाजिक चळवळी आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी रचना वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला नक्की भेट द्या