मला जिंदगी भर तुम्हीच होते लोटले दूर मग आता तुमची मला ही जवळीक नको आजवर पहिली मी माणुसकी तुमची अन् आता तुमचा मला तो आधार नको मदतीची हाक जेव्हा दिली, दूर झालात आता तुमचे कोणते मला, उपकार नको काट्यासारखे टोचत असेल बोलणे माझे उगाच त्याचा आता तुम्हाला बोछार नको सोमेश्वर सिरसाट...✍️ सांग माणसा तुझी र काय आहे ख्याती माणुसकी मी पहिली देतांना मूठ माती उपास मारीने त्याचा जवा जीव गेला म्हणू लागले सारे ,भला माणूस गेला काळा आड गेली त्याची जीवन ज्योती माणुसकी मी पहिली देतांना मूठ माती रडत होते त्याच्या अवती भोवती सारे बिन पावसाचे बघा, नुसते वादळ वारे पुढे पुढे करत होते आता धनाच्या पोटी माणुसकी पहिली मी देतांना मूठ माती शिव्या शाप होता र त्याच्या पाचवीला काय म्हणू आता र फुलांच्या वर्षावला राहिली नाही सोमनाथ आधाराची काठी माणुसकी पहिली मी देतांना मूठ माती सोमेश्वर सिरसाट...
Someshwar Sirsat Shayari हा माझा अधिकृत ब्लॉग असून मी, कवी, गीतकार व शायर सोमेश्वर सिरसाट, सामाजिक, राजकीय, विद्रोही, प्रेम, वास्तववादी तसेच शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीवर आधारित कविता, गाणी, शायरी आणि लेख या ब्लॉगद्वारे प्रकाशित करतो. समाजातील अन्याय, बेरोजगारी, शेतकरी, कामगार, शिक्षण, परिवर्तन आणि मानवी भावनांना शब्दबद्ध करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. मराठी साहित्य, भीमगीत, परिवर्तनवादी लेखन, सामाजिक चळवळी आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी रचना वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला नक्की भेट द्या