मला जिंदगी भर तुम्हीच होते लोटले दूर
मग आता तुमची मला ही जवळीक नको
आजवर पहिली मी माणुसकी तुमची
अन् आता तुमचा मला तो आधार नको
मदतीची हाक जेव्हा दिली, दूर झालात
आता तुमचे कोणते मला, उपकार नको
काट्यासारखे टोचत असेल बोलणे माझे
उगाच त्याचा आता तुम्हाला बोछार नको
सोमेश्वर सिरसाट...✍️
माणुसकी मी पहिली देतांना मूठ माती
उपास मारीने त्याचा जवा जीव गेला
म्हणू लागले सारे ,भला माणूस गेला
काळा आड गेली त्याची जीवन ज्योती
माणुसकी मी पहिली देतांना मूठ माती
रडत होते त्याच्या अवती भोवती सारे
बिन पावसाचे बघा, नुसते वादळ वारे
पुढे पुढे करत होते आता धनाच्या पोटी
माणुसकी पहिली मी देतांना मूठ माती
शिव्या शाप होता र त्याच्या पाचवीला
काय म्हणू आता र फुलांच्या वर्षावला
राहिली नाही सोमनाथ आधाराची काठी
माणुसकी पहिली मी देतांना मूठ माती
सोमेश्वर सिरसाट...


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा