📝 कविता संग्रह “फुटलेला आरसा : समाजाचं विद्रूप वास्तव” जर माझे हे शब्द तुमच्या मनातल्या वेदनेला भिडले, तर नक्की शेअर करा. 1️⃣ इन पुढारीयोंसे यारो जरा रहना बचके जळत्या सरणाचेही हे तोडतात लचके फायदा होत नाही तुम्ही जिवंत असून मग धंदा करतात तुमचे कफन विकून अहो वाघाला सांगते, वाघाची मावशी गल्लो गल्ली चर्चा ही होते दर दिवशी अन् भ्रष्टाचार आता हा वाढला किती मांजरीला झाली हो ती उंदराची भीती हिजड्यांच्या हवेलीत, ते लपले आता सोशल मीडियावर ही व्हायरल कथा — सोमेश्वर सिरसाट ✍️ 2️⃣ आरोपी सांगा कोण आहे रे निर्दोषांच्या खुनाचा, माणुसकीचा घेतला बळी, झरा वाहतो रक्ताचा! आजही घुमतो आहे इथे रे, हा आवाज भ्रष्टाचाराचा, लावू नकारे जखमां वरती मलम तुमच्या हमीचा! सत्य ओरडत उभं हे दारी, न्याय कुणाच्या पक्षाचा? — सोमेश्वर सिरसाट ✍️ 3️⃣ झाले भरा भर पुढारी गल्लीत आता आमच्यासाठी झटणारा एक पाहिजे मी वादे करणारे रोज हजारो पाहतो प्रश्न सोडवणारा फक्त एक पाहिजे — सोमेश्वर सिरसाट ✍️ 4️⃣ भेड़िए अब जंगल में नहीं, संसद में पाए जाते हैं, ज़बान पे सेवा, हाथों में सौदे सजाए जाते हैं। खा...
Someshwar Sirsat Shayari हा माझा अधिकृत ब्लॉग असून मी, कवी, गीतकार व शायर सोमेश्वर सिरसाट, सामाजिक, राजकीय, विद्रोही, प्रेम, वास्तववादी तसेच शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीवर आधारित कविता, गाणी, शायरी आणि लेख या ब्लॉगद्वारे प्रकाशित करतो. समाजातील अन्याय, बेरोजगारी, शेतकरी, कामगार, शिक्षण, परिवर्तन आणि मानवी भावनांना शब्दबद्ध करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. मराठी साहित्य, भीमगीत, परिवर्तनवादी लेखन, सामाजिक चळवळी आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी रचना वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला नक्की भेट द्या