मी क्रांतीच वादळ मराठी कविता | Mi krantich vadal Marathi vidrohi kavita new 2026 || Someshwar Sirsat
“ही कविता नसून आजच्या परिस्थितीचं वास्तव चित्र आहे.“क्रांती शब्दात नाही… विचारात असते.“ही लोकशाही आहे का हुकूमशाही?
मी क्रांतीच वादळ मला नाही कसला नेम
मनगटात शिवबा माझ्या डोक्यात भीम
सावलीच्या खुनाचा आता घेतोया शोध
माय बाप जनतेला कधी होईल तो बोध
रोजगार सारा आता कॉन्ट्रॅक्ट वर गेला
ट्राफिक वाला ही यांनी प्रायव्हेट केला
मग हळूहळू बसचा ही तो नंबर आला
रेल्वेचा मालक म्हणे तो अडाणी झाला
शिक्षण आता बाजारी विकाया लागले
अन् सरकारी शाळा बंद कराया लागले
नोकरीच्या आशेने आता फिरतोय तरुण
नुसता पैसा कमवता तुम्ही फॉर्म भरून
पिकवणारा शेतकरी भाव तुम्ही लावता
युरिया बरोबर तुम्ही सुफलाही विकता
ही लोकशाही म्हणूकी हुकूमशाही सांगा
अन् काय काय विकायच राहील ते सांगा
सोमेश्वर सिरसाट...✍️

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा