मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेतकरी नवीन कविता | new marathi farmer poem | Someshwar Sirsat | सोमेश्वर सिरसाट

पावसात नाचतांना कोणी तो मोर पाहिला  त्याच पावसात राबतांना, मी बाप पहिला तुम्ही पहिल्या असतील रंभा मेनका भले मी पिकासोबत बहरतांना माझा बाप पहिला सोमेश्वर सिरसाट...✍️                       पाणावलेले डोळे  ✍️ कवी: सोमेश्वर सिरसाट ह्या पाणावलेल्या डोळ्यांनी शेत काही भिजेना जगाचा पोशिंदा मी अन माझंच पोट भरेना दुःख माझं ऐकायला आहे का इथं कोणी “जय जवान जय किसान” म्हण ही झाली जुनी प्रश्न माझा तो इथे, कुणालाच कसा हा कळेना जगाचा पोशिंदा मी अन माझंच पोट भरेना दुष्काळ जणू माझ्या पाचवीला पुजला हाय जास्त-कमी आलं पीक तरी त्याला ही भाव नाय म्हणलं शिकवावं लेकराला पण पोटाचं गणित जुळेना जगाचा पोशिंदा मी अन माझंच पोट भरेना सरकारला विनवणी माझी सांगू तरी कशी सरकार दरबारी म्हणतो घ्यावी गळफाशी सोमनाथ सांगतो जगी, त्याच कुणी ऐकेना जगाचा पोशिंदा मी अन माझंच पोट भरेना  शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पाऊल उचललं गेलं पाहिजे. ही कविता त्या वेदना, संघर्ष आणि वास्तव मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. पिकवणारा शेतकरी असतो, पण त्याच्या पिकाचा भाव ठर...

जगाला का कळावे...

ही कविता आत्मशोध, संघर्ष आणि स्वतःशी चाललेल्या झुंजीचं प्रतिबिंब आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातल्या त्या टप्प्याचं वर्णन करते, जिथे तो स्वतःलाच शोधत असतो. मी माझा मला ना कळलो जगाला का कळावे... झुंज आरध्यावरी राहिली माझी सोडूनी का पळावे... मी माझा मला ना कळलो जगाला का कळावे... काटे वाटेत असले कितीही तरी दुर मंजिल ही माझी असली तरी मी प्रवासी या जगाचा चालणे का सोडावे... मी माझा मला ना कळलो जगाला का कळावे... डोंगरापरी दुःख येतील आडवे तुला रे त्यातूनी ही फुटेल एक सुखाचा झरा रे तू उद्धारक तुझ्या जीवनाचा हे तुला कळावे... मी माझा मला ना कळलो जगाला का कळावे... हे गरुडा, घे भरारी, जा उंच त्या आकाशी झूंज तुझी ह्या जगी आता आहे रे स्वतःशी शब्द सोमनाथचे हे तुझ्या अंतरी ते रुजावे... मी माझा मला ना कळलो जगाला का कळावे... सोमेश्वर सिरसाट...✍️  

Vidrohi kavita || Rebellious Social Poetry by Someshwar Sirsat

 📝 कविता संग्रह “फुटलेला आरसा : समाजाचं विद्रूप वास्तव” जर माझे हे शब्द तुमच्या मनातल्या वेदनेला भिडले, तर नक्की शेअर करा.  1️⃣ इन पुढारीयोंसे यारो जरा रहना बचके जळत्या सरणाचेही हे तोडतात लचके फायदा होत नाही तुम्ही जिवंत असून मग धंदा करतात तुमचे कफन विकून अहो वाघाला सांगते, वाघाची मावशी गल्लो गल्ली चर्चा ही होते दर दिवशी अन् भ्रष्टाचार आता हा वाढला किती मांजरीला झाली हो ती उंदराची भीती हिजड्यांच्या हवेलीत, ते लपले आता सोशल मीडियावर ही व्हायरल कथा — सोमेश्वर सिरसाट ✍️ 2️⃣ आरोपी सांगा कोण आहे रे  निर्दोषांच्या खुनाचा, माणुसकीचा घेतला बळी,  झरा वाहतो रक्ताचा! आजही घुमतो आहे इथे रे, हा  आवाज भ्रष्टाचाराचा, लावू नकारे जखमां वरती मलम  तुमच्या हमीचा! सत्य ओरडत उभं हे दारी,  न्याय कुणाच्या पक्षाचा? — सोमेश्वर सिरसाट ✍️ 3️⃣ झाले भरा भर पुढारी गल्लीत आता आमच्यासाठी झटणारा एक पाहिजे मी वादे करणारे रोज हजारो पाहतो प्रश्न सोडवणारा फक्त एक पाहिजे — सोमेश्वर सिरसाट ✍️ 4️⃣ भेड़िए अब जंगल में नहीं, संसद में पाए जाते हैं, ज़बान पे सेवा, हाथों में सौदे सजाए जाते हैं। खा...

मी क्रांतीच वादळ मराठी कविता | Mi krantich vadal Marathi vidrohi kavita new 2026 || Someshwar Sirsat

“ही कविता नसून आजच्या परिस्थितीचं वास्तव चित्र आहे.“क्रांती शब्दात नाही… विचारात असते.“ही लोकशाही आहे का हुकूमशाही? मी क्रांतीच वादळ मला नाही कसला नेम मनगटात शिवबा माझ्या डोक्यात भीम सावलीच्या खुनाचा आता घेतोया शोध माय बाप जनतेला कधी होईल तो बोध रोजगार सारा आता कॉन्ट्रॅक्ट वर गेला ट्राफिक वाला ही यांनी प्रायव्हेट केला मग हळूहळू बसचा ही तो नंबर आला रेल्वेचा मालक म्हणे तो अडाणी झाला शिक्षण आता बाजारी विकाया लागले अन् सरकारी शाळा बंद कराया लागले नोकरीच्या आशेने आता फिरतोय तरुण नुसता पैसा कमवता तुम्ही फॉर्म भरून पिकवणारा शेतकरी भाव तुम्ही लावता युरिया बरोबर तुम्ही सुफलाही विकता   ही लोकशाही म्हणूकी हुकूमशाही सांगा अन् काय काय विकायच राहील ते सांगा सोमेश्वर सिरसाट...✍️

Best Love Shayari in Hindi | Heart Touching Romantic Shayari 2026 || Someshwar Sirsat

  This is one of the best heart touching love shayari in Hindi that expresses deep emotions of true love. If you are looking for romantic shayari, this will touch your heart. फ़ासले बस नज़र के हैं शायद,   दिल तो आज भी वहीं ठहरा है।    तेरी ख़ामोश मुस्कुराहट में,   मेरे हर ख़्वाब का बसेरा है।   रात भर जागती हैं ये आँखें,   तेरा ही नाम लब पे ठहरा है।   तू मिले या न मिले मुक़द्दर से,   इश्क़ मेरा तो तुझसे गहरा है।   — सोमेश्वर सिरसाट