पाणावलेले डोळे
✍️ कवी: सोमेश्वर सिरसाट
ह्या पाणावलेल्या डोळ्यांनी
शेत काही भिजेना
जगाचा पोशिंदा मी
अन माझंच पोट भरेना
दुःख माझं ऐकायला
आहे का इथं कोणी
“जय जवान जय किसान”
म्हण ही झाली जुनी
प्रश्न माझा तो इथे,
कुणालाच कसा हा कळेना
जगाचा पोशिंदा मी
अन माझंच पोट भरेना
दुष्काळ जणू माझ्या
पाचवीला पुजला हाय
जास्त-कमी आलं पीक
तरी त्याला ही भाव नाय
म्हणलं शिकवावं लेकराला
पण पोटाचं गणित जुळेना
जगाचा पोशिंदा मी
अन माझंच पोट भरेना
सरकारला विनवणी माझी
सांगू तरी कशी
सरकार दरबारी म्हणतो
घ्यावी गळफाशी
सोमनाथ सांगतो जगी,
त्याच कुणी ऐकेना
जगाचा पोशिंदा मी
अन माझंच पोट भरेना
शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पाऊल उचललं गेलं पाहिजे.
ही कविता त्या वेदना, संघर्ष आणि वास्तव मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.
पिकवणारा शेतकरी असतो, पण त्याच्या पिकाचा भाव ठरवतात ते AC रूममध्ये बसलेले लोक—हीच खरी शोकांतिका आहे.
शेतकऱ्याच्या पिकाला भाव देण्याचा अधिकार फक्त शेतकऱ्यालाच दिला,
तरच या देशाला खरी शेती काय असते हे समजेल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा