ही कविता आत्मशोध, संघर्ष आणि स्वतःशी चाललेल्या झुंजीचं प्रतिबिंब आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातल्या त्या टप्प्याचं वर्णन करते, जिथे तो स्वतःलाच शोधत असतो.
मी माझा मला ना कळलो
जगाला का कळावे...
झुंज आरध्यावरी राहिली माझी
सोडूनी का पळावे...
मी माझा मला ना कळलो
जगाला का कळावे...
काटे वाटेत असले
कितीही तरी
दुर मंजिल ही माझी
असली तरी
मी प्रवासी या जगाचा
चालणे का सोडावे...
मी माझा मला ना कळलो
जगाला का कळावे...
डोंगरापरी दुःख येतील
आडवे तुला रे
त्यातूनी ही फुटेल एक
सुखाचा झरा रे
तू उद्धारक तुझ्या जीवनाचा
हे तुला कळावे...
मी माझा मला ना कळलो
जगाला का कळावे...
हे गरुडा, घे भरारी, जा
उंच त्या आकाशी
झूंज तुझी ह्या जगी आता
आहे रे स्वतःशी
शब्द सोमनाथचे हे तुझ्या
अंतरी ते रुजावे...
मी माझा मला ना कळलो
जगाला का कळावे...
सोमेश्वर सिरसाट...✍️

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा