भ्रष्टाचारी नेत्यांचे नागरीत्व काढा
हे बेईमान सारे भर चौकामध्ये झोडा !!धृ!!
सडका कांदा नको सारे सडविल जो कांदे
दीन दुबळ्या जनतेचे जो करतोय र वांधे
क्रांतिकारी रोगरचा यांना पाजूया र काढा
हे बेईमान सारे भर चौकामधी झोडा !!१!!
मतासाठी येतील हे जोडतील हात पाय
मग पाच वर्ष यांचा कुठ ठिकाणाच नाय
लुटल यांनी किती हे मोजमाप काढा
हे बेईमान सारे भर चौकामधी झोडा !!२!!
नकोय तुमचे आश्वासन नकोय तुमची हमी
अधिकार मिळऊया र आता आमचे आम्ही
क्रांतीच्या विचारात शब्द सोमनाथचा जोडा
हे बेईमान सारे भर चौकामधी झोडा !!३!!
सोमेश्वर सिरसाट ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा