भीम डोक्यात घ्यारे...
शिव शाहू फुले आंबेडकरी
चळवळीचे पाईक व्हारे
भीम डोक्यावर नाही आता
भीम डोक्यात घ्यारे...
जो तो म्हणतो या चळवळीचे
होणार काय
सांग समाजाच्यासाठी गड्या
तू केलं काय
बेकी नको आपसात आता
सारे एक व्हारे
भीम डोक्यावर नाही आता
भीम डोक्यात घ्यारे...
अन्याय होता कोणावरती हा
घरात बसतो
मोबाईल वरून नुसतेच गडी
मेसेज करतो
समता सैनिक दलाचे आता
तुम्ही सैनिक व्हारे
भीम डोक्यावर नाही आता
भीम डोक्यात घ्यारे...
सवलती घ्यायाला हा फक्त
पुढे,पुढे येतो
समाजाच्या कामाला हा नाक
तोंड झाडतो
सोमनाथचे शब्द तुमच्या हे
आता मनी रुजवारे
भीम डोक्यावर नाही आता
भीम डोक्यात घ्यारे...
सोमेश्वर सिरसाट...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा