भ्रष्टाचारी उंदरांचा सुळसुळाट हाय
कसायाच्या दावणीला जशी
बांधली र गाय
आर ह्यो भ्रष्टाचारी उंदराचा
सूळसुळाट हाय
उंदराला मामा म्हणता म्हणता
मामा झाली जनता
काळा पैसा ठेवायला कसली
हो क्षेत्रफळ घनता
स्विच बँक आमुची र गड्या
म्हणे खंबीर हाय
आर ह्यो भ्रष्टाचारी उंदराचा
सुळ सुळाट हाय
आश्वासनाची नुसती आहे
माडी वरती माडी
राज्यकर्ता घेतोय र नवीन
बंगला अन गाडी
देशाला लुटाया सोमनाथ
सारे टपलेले हाय
आर ह्यो भ्रष्टाचारी उंदराचा
सुळ सुळाट हाय
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा