गहिवरून बोले रमाई साहेबाला तुम्ही जाव परदेशाला मी चालविण घराला तुम्ही जाव परदेशाला मी चालविन घराला चिंता सोडा साहेब तुम्ही घरा.... दराची.... शेण गोवऱ्या थपूनी चालली गाडी संसाराची पूर्ण करावे तुम्ही मामाजिंच्या सपनाला तुम्ही जाव परदेशाला मी चालविन घराला कसा आज बेदर्दी आला तो काळ सोडूनी गेले आम्हा गंगाधर बाळ काळाने घातलाय आज घाव काळजाला तुम्ही जाव परदेशाला मी चालविन घराला सांगे सोमनाथ साऱ्या जगाला ग बाई दुखी जनांची झाली ती माता रमाई दारिद्र्याच्या आग्नित जाळूनी जीवाला तुम्ही जाव परदेशाला मी चालविन घराला...
गीतकार सोमेश्वर सिरसाट मो. 8087948366/9324540468