मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवल

  शिक्षणाच महत्व हे तुम्हा आम्हाला पटवल  फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवल स्त्री शिक्षणाची तेव्हा होती हो गरज देशाला  मुलींची पहिली शाळा ती काढिली पुण्याला शिकवण्या मुलींना सावित्री माईला शिकवल फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवल दीन दुबळ्या जनतेची होती परिस्थिती मंदी शाहू महाराजांनी दिली हो शिक्षणाची संधी प्राथमिक शिक्षण हे त्यांनी सक्तीच बनवल  फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवल शिकला होता भीम तो वर्गाच्या बाहेर बसून उच्च शिक्षण घेऊन आला ते परदेशी जाऊन शिक्षण हे वाघिणीचे दूध भीमाने शिकवल फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला नटवल सोमेश्वर सिरसाट... 8087948366 somasirsat8 2@gmail.com