मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मूठ माती

सांग माणसा तुझी र काय आहे ख्याती माणुसकी मी पहिली देतांना मूठ माती उपास मारीने त्याचा जवा जीव गेला म्हणू लागले सारे ,भला माणूस गेला काळा आड गेली त्याची जीवन ज्योती माणुसकी मी पहिली देतांना मूठ माती  रडत होते त्याच्या अवती भोवती सारे बिन पावसाचे बघा, नुसते वादळ वारे पुढे पुढे करत होते आता धनाच्या पोटी माणुसकी पहिली मी देतांना मूठ माती शिव्या शाप होता र त्याच्या पाचवीला काय म्हणू आता र फुलांच्या वर्षावला राहिली नाही सोमनाथ आधाराची काठी माणुसकी पहिली मी देतांना मूठ माती                         सोमेश्वर सिरसाट... 

भीम डोक्यात घ्यारे...

भीम डोक्यात घ्यारे...  शिव शाहू फुले आंबेडकरी चळवळीचे पाईक व्हारे भीम डोक्यावर नाही आता भीम डोक्यात घ्यारे... जो तो म्हणतो या चळवळीचे होणार काय सांग समाजाच्यासाठी गड्या तू केलं काय बेकी नको आपसात आता सारे एक व्हारे भीम डोक्यावर नाही आता भीम डोक्यात घ्यारे... अन्याय होता कोणावरती हा घरात बसतो मोबाईल वरून नुसतेच गडी  मेसेज करतो समता सैनिक दलाचे आता तुम्ही सैनिक व्हारे भीम डोक्यावर नाही आता भीम डोक्यात घ्यारे... सवलती घ्यायाला हा फक्त पुढे,पुढे येतो समाजाच्या कामाला हा नाक तोंड झाडतो सोमनाथचे शब्द तुमच्या हे आता मनी रुजवारे भीम डोक्यावर नाही आता  भीम डोक्यात घ्यारे...                                     सोमेश्वर सिरसाट...

हे बेईमान सारे भर चौकामधी झोडा

  भ्रष्टाचारी नेत्यांचे नागरीत्व काढा        हे  बेईमान सारे भर चौकामध्ये झोडा !!धृ!! सडका कांदा नको सारे सडविल जो कांदे दीन दुबळ्या जनतेचे जो करतोय र वांधे क्रांतिकारी रोगरचा यांना पाजूया र काढा  हे बेईमान सारे भर चौकामधी झोडा !!१!! मतासाठी येतील हे जोडतील हात पाय मग पाच वर्ष यांचा कुठ ठिकाणाच नाय लुटल यांनी किती हे मोजमाप काढा हे बेईमान सारे भर चौकामधी झोडा !!२!! नकोय तुमचे आश्वासन नकोय तुमची हमी अधिकार मिळऊया र आता आमचे आम्ही क्रांतीच्या विचारात शब्द सोमनाथचा जोडा हे बेईमान सारे भर चौकामधी  झोडा !!३!!                                          सोमेश्वर सिरसाट ...