मुख्य सामग्रीवर वगळा

सांग ना ग पिल्लू...

   गीत सांगना ग पिल्लू.....




                          गीतकार :- सोमेश्वर सिरसाट

तुला सोनू मोनु जानू 
आता कुठवर म्हणायचं
सांगना ग पिल्लू....... 
कधी लगीन करायचय

चढली प्रेमाची धुंदी
आली धंद्यात मंदी
तू भेटली थेटर मधी
घरी सांगून गेली चंदि
लपून छपून ग जानी
आस कुठवर भेटायच
सांगना ग पिल्लू......
कधी लगीन करायचय

मर्द गडी असा रंगला
बांधला दीलामधी बंगला
जीव तुझ्यातच दंगला
जोडा शोभल ग चांगला
चौकमधी तुझ्या माझ्या
लग्नाच बॅनर लावायचय....
सांगना ग पिल्लू......
कधी लगीन करायचय

लय खाऊ नको भाव 
सांगे सोमनाथ राव
गान वंसाच लाव
तवा नाचल सारा गाव
डिजेच्या ताला वरती
आज मलाबी नाचायचय

सांगना ग पिल्लू.....
कधी लगीन करायचय



टिप्पण्या

  1. एकदम झकास गाणं आहे दाजी...कडक.
    पण पिल्लु चा पत्ता आपण मला दिला तर लवकर च लगीन जमवुन टाकु बार उडवून लगीनाचा....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा