मुख्य सामग्रीवर वगळा

विसरली मला ती मी तिला विसरतो


 रोज रोज मनाला मी माझ्या सांगतो

विसरली मला ती मी तिला विसरतो


विसरता विसरता तिची आठवण येते

डोळ्याची पापणी का भिजऊन जाते


विसरायच आहे तिला का मी विसरतो

विसरली मला ती मी तिला विसरतो 


विसरण्या तिला काल पिऊनिया आलो

मित्रालाही आठवण तिची सांगुनी आलो


खेळ आठवणीचा सोमनाथ चालतो

विसरली मला ती मी तिला विसरतो 

                         सोमेश्वर सिरसाट...

टिप्पण्या