मुख्य सामग्रीवर वगळा

मारतो फाट्यावर || Marto Fatyavar Marathi Song by Someshwar Sirsat 2026

            


              घरदार झाडल तेव्हा पाण्याच्या घाटावर

आता ते बडवे आम्ही मारतो फाट्यावर


भीमाने केली अशी किमया ही न्यारी

मतदानाच केलं आम्हाला अधिकारी

देशाचा प्रतिनिधी आहे आमच्या वोटावर

आता ते बडवे आम्ही मारतो फाट्यावर


भीमाने आम्हाला ते सांगितले आहे

अहो दूध वाघिणीचे शिक्षणात आहे

त्यांच्या विचारांनी गेलो मोठ्या हुद्यावर

आता ते बडवे आम्ही मारतो फाट्यावर


गेली ती झोपडी अन गेली ती वाडी

राहायला मला हो सात मजली माडी

बुद्धांची मूर्ती लावली माझ्या दारावर

आता ते बडवे आम्ही मारतो फाट्यावर

टिप्पण्या