पहिलं जवा तुला ग पोरी घाव काळजावर पडला तुझ्या रूपानं केलीया जादू जीव तुझ्यावरी जडला.... तुझ्या प्रेमाची ग आस मला लागला तुझा ध्यास लव यू च अक्षर खास सांगायचं तुला कस सूचना ग काही मला जीव पेचात पडला... तुझ्या रूपानं केलीया जादू जीव तुझ्यावरी जडला.... दिसे रंगानं तू गोरी माझ्या स्वप्नातली परी केली दीलाची तू चोरी जीव बसला तूझ्यावरी असा कसा प्रेमाचा गजब इतिहास घडला... तुझ्या रूपानं केलीया जादू जीव तुझ्यावरी जडला.... फिरू खंडाळा घाट शब्द देतो सोमनाथ धर ग प्रेमाची वाट सात जन्माची ग साथ
गीतकार सोमेश्वर सिरसाट मो. 8087948366/9324540468