भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव प.पुज्य विश्वभूषन क्रांतीसूर्य विश्वरत्न डॉ.बाबासाहेब अंबेडकर यांना ञिवार अभिवादन. १४एप्रिल १८९१ रोजी.आई भिमाईच्या पोटी ,१४ तारखेला,१४ वे रत्न आले जन्माला. आठवन करा त्या इतिहासाची स्वतंञ पुर्व काळाची. भारतावर हुकूमत होती, इंग्रज सरकाराची . भारतीय लोक इंग्रजांचे गुलाम होते. आणि त्या काळामध्ये हे दलित गुलामांचेही गुलाम होते. आणि त्याच गुलामीची जंजीर तोडण्यासाठी एक शोला भडकला होता.एक ज्वालामुखी कडकला होता. तोच तर हा भिम रामजी अंबेडकरांचा बेटा होता. रामजी बाबा लष्करात सूभेदार होते. बाबासाहेबांनी खूप शिकावे ,मोठे व्हावे ,विद्ववानाच्या रांगेमध्ये आग्रेसर राहावे.अशी रामजी बाबांची मनापासून इच्छा होती. त्या काळामध्ये असलेली जीतीयता,रूढी परंपराआणि मनुवाद्यांचे षडयंञ यामूळे जगन असाह्य झाल होते.गळ्यात मडके आणि पाठीला झाडू यांमूळे ञस्त असलेल्या या दलितांना गुलामगीरीतून मुक्त करावे ,असे रामजी बाबांना वाटत होते. बाबासाहेब शाळेत जात असतांना त्यांना वर्गाच्या बाहेर बसावे लागत असे . शाळेत पिण्याच्या पाण्याची सो...