सांग माणसा तुझी र काय आहे ख्याती माणुसकी मी पहिली देतांना मूठ माती उपास मारीने त्याचा जवा जीव गेला म्हणू लागले सारे ,भला माणूस गेला काळा आड गेली त्याची जीवन ज्योती माणुसकी मी पहिली देतांना मूठ माती रडत होते त्याच्या अवती भोवती सारे बिन पावसाचे बघा, नुसते वादळ वारे पुढे पुढे करत होते आता धनाच्या पोटी माणुसकी पहिली मी देतांना मूठ माती शिव्या शाप होता र त्याच्या पाचवीला काय म्हणू आता र फुलांच्या वर्षावला राहिली नाही सोमनाथ आधाराची काठी माणुसकी पहिली मी देतांना मूठ माती सोमेश्वर सिरसाट...
गीतकार सोमेश्वर सिरसाट मो. 8087948366/9324540468